|| जय शिवराय ||

सस्नेह जय शिवराय…..
माझं असं काहीच नाही…..
ऐकलं,वाचलं,अनुभवलं तेच शब्दरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न.त्या तमाम उर्जास्त्रोत्राना माझा सलाम.
आपले विचार हिच आपली सात्वीक संपत्ती असते.
आपले विचार म्हणजेच आपले कर्म …कर्माची व्याख्या जरी वेगळी असली तरी तिचा मुळ पाया आपले विचार असतात. सगुण विचारांची जोड असेल तर आणि तरच तुम्ही चांगले कर्म करु शकता. दुर्गुण, दुराचारी विचार जर असतील तर तुमच्या हातून दुष्कृत्य घडल्याशिवाय राहणार नाही.विचारांची देवाणघेवाण जरी सोईस्कर असली तरी तुमचा सगुण विचार तुम्ही ईतरांच्या मनावर तितक्या सहजतेने प्रस्तापीत करु शकत नाही. याऊलट दुर्गुण विचार तुम्ही प्रस्तापीत करु शकता……याला कारण आपला समाज हा बहुतांशी लोकांवर अवलंबुन राहू लागला.सुखाच्या मागे धावु लागला.मृगजळ ते …तसं मिळत नसतं….आता तुम्हीच विचार करा जर तुमचं महत्वाच काही काम आहे…आणि तुम्हाला कुणी म्हटलं की तो माणुस खुप चांगला आहे. तुम्ही ते काम त्याच्याकडे सोपवा..तरीही तुमच्या मनात ,डोक्यात विचारांचं युद्ध माजनार.काम देउ की नको या संभ्रमावस्थेत तुम्ही पडनार…ऊलटपक्षी तुम्हाला कुणी म्हटल किंव्हा गावात चर्चा जरी असली की तो वाईट आहे तर तुम्ही तात्काळ विश्वास ठेवणार….. म्हणजेच तुमच्या जवळच्या माणसानी तुम्हाला सांगीतलं तरी तुमची संभ्रमावस्ता….आणि लोकांच्या सांगण्यावर लगेच विश्वास……कुणी म्हणन्या पेक्षा आपल्याही विचारांच मंथन आपण करायला हवं……मुद्दा हा असतो की आपण आपल्या बुद्धीने जे आजवर कमावलय …..चांगलं,वाईट,शुभ,अशुभ,संस्कार, कुसंस्कार,ई.त्याच्या नुसार एखाद्या गोष्टीला तोलून,मापून,तपासून तीच्या निश्कर्षापर्यंत पोहचने…..आपल्या बुद्धीला जे पटेल ते…..
ते ईतराना पटेलच असं नाही…
ऊदा. शाळेतला विद्यार्थी ज्याप्रमाणे परीक्षेच्या वेळी आपल्या पुर्ण वर्षातील अभ्यासक्रमावर जोर लावून, ढवळून जे याेग्य ते निवडतो ….त्याला विचार करणे म्हणतात. आजच्या परीस्तीथीनुसार म्हणायच झालं तर कंप्युटरमधे सर्च म्हणुन जो रकाना असतो …त्यात आपण काही सर्च केलं की तो जसा पुर्ण पीसी शोधतो, त्याची जी धडपड असते ती विचार करण्याची असते असं मला वाटतं……विचारांचं मोल सर्वधीक असतं. तुमचं शिक्षण किती आहे ते महत्वाचं नाही.तुमचे विचार कसे आहेत .ते समाजाला किती हितकारक आहेत ते महत्वाचे….आज उच्च शिक्षीत समाज संस्कार हिन झाल्याचे प्रतीत होत आहे…..असो ते मी ठरवू शकत नाही.
आपले मन हे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. कारण मनात येणारे विचार हे आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम सातत्याने करीत असतात. इष्ट अनिष्ट विचारांप्रमाणेच आपले जीवन साकार होत असते.
मानव जातीमधे कितीतरी प्रकारच्या रुढी परंपरा आहेत पण त्याचा विचार आपण आजच्या वस्तुस्थीतीशी केला पाहीजे.काय पाप काय पुण्य याचा गांभीर्याने विचार करायला हवा.आता आपण केस,नारळ, हार,सोने,चांदि,अमुक तमुक परमेश्वराला अर्पुन पुण्य मिळते ? भाग्य उजळते? काय उपयोग या दान धर्माचा? देवला हे काही हवं नसतं . देव श्रद्धेचा भुकेला अंधश्रद्धेचा नाही. गरजूंना मदत करा .जो आपल्याला देतो आणि देण्यासाठीच बसलाय म्हणा….त्याला तुम्ही काय देणार….तुम्हाला असं म्हणायचं आहे का ? की देवाकडे काही नाही……हल्ली माणूस काहीही विचार करू शकतो….तमोगुणी माणसांची संख्या वाडली म्हणजे नितीनं जगणार्याना त्रास होणार हे निच्छित….
………नितेश पाटील