तस्वीर शेर

तस्वीर देख़ खुदको तराशने लगे हम
बीते लम्हों को भुला न सके हम
पर न जाने किसी कोशिश में
उन्ही लम्हों को याद करने लगे हम
………नितेश पाटिल
25.9.2015

शिवा डेकोरेशन ग्रुप धनसार

🙏🙏
झालं अखेर बाप्पाचं आगमन झालं आणि बसलेही…
गणपती बाप्पा मोरया….
तुम्हा आम्हा सर्वांनाच गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….बाप्पा विराजमान होण्याआधी सर्वांची धडपड हा सोहळा ईमाने ईतबारे कसा पार पडेल…मग त्यासाठी बाप्पाबरोबरच स्वतःची खरेदी करण्यात अापण दंग असतो…
आणि आम्ही मात्र वेगळ्याच विश्वात असतो….असो आम्हीही आता सुस्कारा सोडला.पण चलचित्र सजावट करता करता आम्हा सर्वांची दमछाक निघून जाते….पण ती ही ऊत्साही आणि आनंदमय ….
आम्ही साकारलेले
चलचित्र सजावट दृष्य…
१.नरसिंह अवतार …सफाळे कुर्लाई रोड( पात्र ६)
२. श्री कृष्ण-पुतना….बोईसर रेल्वे स्टेशन ( पात्र ५)
३.कुंभकरण वध…बोईसर काटकर पाडा ( पात्र ४)
४. तुकाराम गाथा…बोईसर ओत्सवाल ( पात्र २)
५. निसर्गरम्य दृष्य कैलास पर्वत…बोईसर सिडको ( पात्र १)
६. कृष्ण जन्म….बोईसर 3&4 ( पात्र ७)
७. साईबाबा कृष्णअवतार…बोईसर कुरगाव ( पात्र ५)
८.साईबाबा दिपावली ….बोईसर कुंभवली (पात्र ३)
९.लोहार धमनी (लहान)….बोईसर मार्केट ( पात्र २)
१०.साधु देवी ( लहान)…वडराई ( पात्र ३)
बाकी आहेत घरात..
पण वेळेचा अभाव….
ईतके चलचित्र ७..८ दिवसात स्टेजवर साकारणं तसं शर्थीच काम….पण आमची एकजूट एकंदरीत मजबूत…गणेशकृपेने सारी कामं वेळच्या वेळेवर होतात….
आमच्याविषयी म्हणाल तर हे आवड म्हणून निवडलेल क्षेत्र….सुरवात शिवनाथ घरत ह्यांनी केली.मागे वळुन पाहिलं तर म्हणता म्हणता पंधरा वर्षे ह्या क्षेत्रात सरलेली नजरेस पडतात…आठवणी भरपुर आहेत…
वर्षभर सर्वजण आपआपल्या कामात दंग असतात.सर्वच चांगल्या कामात आहेत….हि हौस आणि म्हणाल तर एकत्र येण्याच साधन…हा आता रुपये मिळतात हे नाकारता येणार नाही म्हणा….. दरवर्षी पावसाळा चालू झाला की (जुन)आम्ही एकत्र येऊन दररोज रात्री ९ ते ११,१२ पर्यंत काम करून सारे पात्र सज्ज करायचे…. आणि
बाप्पा येण्याच्या आधी सारे चलचित्र स्टेजवर बसवून आपापसात संवादांसाठी तयार करायचे…..म्हणजे
पहिल्याच दिवशी मंडळाने सोपवलेल्या कामाची पावती मंडळाकडून आणि लोकांकडूनही मीळते लागलीच दोन महीन्याच्या परीश्रमाचा पुर्ण थकवा नाहीसा होतो….
“शिवा डेकोरेशन ग्रुप धनसार”
शिवनाथ घरत,नितेश पाटील,शैलेंद्र राऊत,कल्पेश घरत,रमेश राऊत,संजय माने,मकरंद घरत.
त्यात ताईचं नाव टाकायच राहून गेलं…..
प्रिया शिवनाथ घरत
तिचाही सहभाग मोलाचा आहे…
दोन महिने रोज रात्री चहा,नाष्ता…
गणपती बसन्या आधीचे १० दिवस आमच्या टिमला जेवण….
पात्रातील महिलांची वेशभुषा….
अनुभवही भरपुर आहेत…त्याला ईथे शब्द कमी पडतील …पण तुम्ही नक्की चलचित्र बघायला या….
……….नितेश पाटील
१८.९.२०१५

पाटील

पाटील……
सध्यस्तिथ पाहता एक आडनाव…
आडनावावरुन जाती ओळखन्याचा, त्यावरुन उच निच,स्पृष्य अस्पृष्य,असा फार काही गदारोळ नजरेस आल्याशिवाय राहत नाही…कैक प्रकारचे आडनाव आपणास आढळतात.
आमच्याकडेहि पोलीस पाटलाची प्रथा होती. आता पुसली गेली.
पाटील हे पदनाम असेल. ते आडनाव नसेल बहुदा. पुर्वी मौर्य काळात जमीनीसबंधीत सर्व लीखान कापड्च्या पट्ट्यावर (पट्ट) नमुद करत असत आणि ते सांभाळुन ठेवण्यासाठी बांबूच्या तुकड्याचा ( कीलक) वापर केला जाई. आणि हेे व्यवहार,लेखाजोखा ज्याच्याकडे सुरक्षीत ठेवले जात असे त्याला पट्टकिलक म्हणुन संबोधत होते. हिच प्रथा वरच्या स्तरापासून खालच्या स्तरांपर्यंत रुढ होती.कालांतराने पटेटकिलकला पट्टईल म्हणुन संबोधण्यात येउ लागली..आणि आता पाटील, पटेल…म्हणुन कदाचीत पाटील हे बर्याच जातींमधे आढळतात…
मला वाटतं ते पदनामाचं आता आडनाव झालय…

देव भेटतो का…?

……..नितेश पाटील…..

माणसात जरी परमेश्वर असला…
तरी तो मिळणे सोपं नसते…
आता हेच बघा ना सारे ग्रंथ, वेद, पुराणांच म्हणनं आहे परमेश्वर आपल्यात आहे आणि आपण त्याला शोधतो कुठे ? देव्हारयात,मंदिरात. हे काही साधन नसेल तर वर बधुन…
विषेश म्हणजे आपण आपलच समाधान करत असतो….देव पुजला म्हणुन..पण मी निच्छीत सांगु शकतो…देव देव्हारयात मिळत नसतो.. गाईच्या कासेत असनारया गोचिडाला जशी दुधाची चव नसते त्यातला हा प्रकार…. आपल्या आचरणामधे ताकत असते त्याला मिळवण्याची,आपल्यात जागृत करण्याची….आज देव लोकांनी कुठेही बसवला…देवाच्या नावावर आपला स्वार्थ साधु लागला माणुस…काहि ठिकाणि इतक्या  घाणेरड्या जागेत असतो कि किव येते.आणि ते पाहुन आपण माणुस आहोत ह्याची लाज वाटायला लागते…..पण सर्व ठायी परमेश्वर असतो हे आठवल की मन खिन्न होउन जाते…आठवत ते गीत…कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, ह्रुदयातील भगवंत राहीला.. ह्रुदयात ऊपाशी…मी देवाला मनातच पुजलं पाहिजे अन्यत्र नाही.माझं इतरांप्रती आचरण चांगल असलं पाहिजे.खर सांगायच तर …आज तुम्हि बघाल तर अब्जावधी रुपयाच्या प्राॅपट्या ह्या मंदिरांच्या,संस्थानाच्या नावे…त्याचा समाजाला फायदा काय? असेलही पण तो किती प्रमाणात ? आणि सामान्य माणुस मात्र अंधश्रद्धेपोटी आपल्या कमाईतला काही भाग (रुपये) देव देव करत यांना दान करतो(दिलाच पाहिजे पण तो गरजुना..देवाला काय गरज?)…अपेक्षा सुखाची ..मिळतं काय ? …मृगजळ ते त्याच्या मागे लागून ते मिळनार आहे का….नाही …माणुस म्हणुन जगल म्हणजे सार काही साध्य होते.माणसाची साधी व्याख्या आहे…दुसरयाचा आत्मा न दुखवनं त्याला जाणनं म्हणजे माणुस….बस
हे जर आपण केलं तर परमेश्वराची ताकत नाही आपल्याला दुखी ठेवायची… शेवटी जैसे ज्याचे कर्म…हा माझा अनुभव आहे..

……..नितेश पाटील……
         ३.९.२०१५