आपण नेहमी म्हणत असतो. लहान मुलांचं आयुष्य किती सुंदर असतं. खेळ, अभ्यास आणि पाहिजे तसे लाड करून घ्यायचे. आणि आपण त्यांना तसं करूनही देतो कारण शेवटी मुलं ती..!! पण लहान मुलं ज्याप्रमाणे जगतात त्यातले काही मुद्दे प्रौढणीही आत्मसात करायला हरकत नाही.
जसं मानापमानाचा विचार न करता जगामध्ये प्रारब्ध, प्रपंच नाही समजून, सर्व चिंतेचा परीहार करून लहान मुलासारखे राहून आनंद भोगायला काय हरकत आहे. म्हणजे जीवन सहज सोपं नाही का ? परीक्षेचा काय तो घोळ राहील. परीक्षा काय हो..!! अभ्यास केला कि पास होणारच..!! अभ्यास करून कुणी नापास होत असतं का ?
आयुष्य ही असंच असतं. पण आयुष्याची प्रश्नपत्रिका मात्र आपल्याच कृतीतून तयार होत असते. आणि त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरंही त्या कृतीच फलस्वरूप असते. आपल्याला वाटतं कि ती उत्तर आपण भारतोय पण तसं नसतं. आता हेच गया ना ..!! एखादं चित्र तुमच्या मनात कितीही सुबक असुद्या… पण ते तुम्ही कश्या प्रकारे रेखाटताय त्यावर त्याच सौंदर्य अवलंबून असतं. बाकी काय ?
माणुस कसा वागतो याला जास्त महत्व असते अगदी तो काय बोलतो, काय लिहतो त्यापेक्षाही…
…..नितेश पाटील
९६३७१३८०३१
