नित
Watch “Ratangad Trek 2.1.2016” on YouTube
नित
नित
आयुष्य गमतीदार असतं. कुणी स्वतःच्या विश्वात दंग असतो.कुणी दुसऱ्याच्या विश्वात आपलं सुख शोधण्यात दंग असतो.असे फार कमीच असतात म्हणा..!!! पण एक धडपड असते आपली किंमत उमजण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची, या माया नगरीत आपलं अस्तित्व शोधण्याची…
नाना प्रकारचे अनुभव प्रतिक्षण आपल्याला येत असतात. त्यातून काय घ्यावं नि काय नाही हा जरी सर्वस्वी आपला प्रश्न असला तरी एखाद्या विचाराधीन आपण वाहवत जात असतो.वाहवत जात असताना त्यामागचा संघर्ष, वस्तुस्तिथी आपण लक्षात घेतली पाहिजे. आज भासवणाऱ्यांची या दुनीयेत कमी नाही. आजचा समाज हा दिखाउपणाच्या आभासी जगात वावरत आहे. आणि त्याचीच किंमत तो यथावकाश का असेना पण मोजत असतो.
माणसाची किंमत हि निश्चितच त्याच्या दिसण्यावर नसते. असेलही पण ती किती काळ…??? एखादा माणूस आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी ओतप्रोत वाहून देतो. त्याच्या नशीबी काय येतं..? जो आयुष्यभर खस्ता खातो त्याचा वापर फक्त चवीसाठी व्हावा..!! पण दोष कुणाला द्यावा..? एक लक्षात घेतलं पाहिजे आजवरचा इतिहास पाहता चव घेणारे नामशेष होतात आणि देणारे निरंतर स्मरणात राहतात.त्यांची चव कण कण खण्याऱ्याच्या ह्रुदयात वास करत असते अगदी त्याने न दाखवली तरीही, त्याला न उमजली तरीही….
स्वयंपाक घरातील भाजी कापण्याचा पाट ज्याप्रमाणे स्वतःवर असंख्य असे वार झेलत झिजत असतो. त्या झिजण्यात आपण कुणालातरी सुख देतोय. आपला अंश न अंश सत्कर्मी लागतोय हीच भावना असावी. पण त्या वार करणाऱ्या हत्यारास त्याची कीव येत नाही. त्याचे तेज धारदार हत्यार असंख्य यातनांचा भडीमार जरी करत असले तरी तो हा कि सु करत नाही.
खऱ्या अर्थाने आयुष्याची झीज होणं तेच काय हे..?? आता तुम्ही म्हणाल निर्जीव वस्तू ती…पण झाडं निर्जीव नसतात. त्या झाडांचा तुम्ही तुमच्या सोईनुसार खून करायचा. खून केल्यानंतर त्या मृत देहासही नष्ट होईस्तोवर तुडवत बसायचं. असा काय गुन्हा हो त्याचा..???
सांगायचं तात्पर्य इतकंच. जे झिजतात आपल्यासाठी त्यांना विसरू तर नयेच पण त्यांचा वापर स्वस्वार्थासाठी करू नये. भमट्यांची दुनिया फार कमी जे दुसऱ्यासाठी जगतात….
जिवंतपणी खून माझा
मृत्यू पश्चात न अंत
वाहीले सर्वस्व तुला
काय गुन्हा मी झिजतो..
……..नितेश पाटील
नित
कालचा दिवस माझ्या आयुष्यातील अतिशय मोलाचा दिवस. फेसबुक च्या आभासी जगात एक जागृत, सशक्त आणि माणसांना सत्कार्यासाठी, कलावंतांना विशेष ओळख देण्यासाठी एक कुबेर नावाचं वृक्ष संतोष जगन्नाथ लहामगे सरांनी वाडीस घातलं. आणि आज तो वृक्ष नव्हे तर कल्पवृक्ष म्हणून बहरून निघत आहे. त्यासाठी त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांस मनाचा मुजरा.
माझं भाग्य कि आज मी कुबेर समूहाचा सदस्य आहे.कुबेर समूह हा सर्वगुणसंपन्न आहे. प्रत्येकाची कलाकारी वेगळी, विलक्षण जिला तोड नाही. कुबेर सदस्यांचे काय कौतुक करू मी. माझ्याकडे शब्दच नाहीत. सारेच आपापल्या जागी हिरे आणि काही तर परिसच. कुबेरचं कौतुक म्हणजेच सऱ्यांचं कौतुक कारण ते मुळात वेगळे नाहीच. सारे मनाने कुबेर. दुसऱ्याचं मन कसं जपायचं हि कला सार्यांनाच अवगत..!! आणि त्यासाठी विशेष आभार कुबेराकरांचे….
कालच ठाणे येथे १६.१.१६ कुबेर स्नेह संमेलन अभूतपूर्व सोहळा पार पडला. सारी माणसं अगदी दिलखुलास. जणु घरचं ते..!!! एक कौटुंबिक मेळावा. सारे कुबेरकर भन्नाटच..!! एका पेक्षा एक…!!
पण आवर्जून उल्लेख करावा तर संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविलेल्या सौ.लीला छाजेड आई ज्यांनी स्वतःची किडनी सुनेला देऊन सासू सुनेच्या नात्याची खरी ओळख जगाला करून दिली. सुनेला खऱ्या अर्थाने मुलीचा दर्जा दिला नव्हे. त्यांच्या भाषेत त्यांनी मुलीला जन्म दिला.त्यांना सलाम…आजच्या स्वार्थी जगात अशी माणसं आहेत यावर विश्वास बसत नाही ना..?? पण देव प्रत्येकाच्या ह्रुदयात असतो हे परम सत्य आहे. त्या माऊलीचं बोलणं एकूण डोळ्याच्या कडा पानावल्या. आणि देव माणसात असतो हि जाणीव दृढ झाली.त्या मातेस शत शत नमन…
आणि दुसरी गोष्ट म्हणजे माई ( सिंधुताई सकपाळ). खरंतर या नावातच सारं काही आलं. त्या माऊलीचा संघर्ष, त्याग, परिश्रम हे फक्त आपण ऐकायचं. ते आत्मसात करण्याचं धाडस करणं सोपं असलं तरी अमलात आणणं तितकं सहज काम नाही. पण प्रयन्त जरूर करावा आपापल्या परीने.त्यांचं अवघ्या ३० मिनीटांचं मार्गदर्शन आणि जीवनी ऐकताना सऱ्यांचेच डोळे पाणावले. आणि देव आहे यावर पुनःच्छा शिक्कामोर्तब झालं. धन्य ती माऊली. पोटची पोरगी दान करून लाखो अनाथांची माय झाली. माईस मनाचा मुजरा, शत शत नमन….
आणि सारं अनुभवायला शिकायला मिळालं ते कुबेरमुळे….खूप खूप आभार कुबेराकरांचे…मनापासून धन्यवाद…
नित