भक्ती (श्रद्धा )

_____स्वतःच्या संरक्षणाची काळजी नाही अशी माणसं क्वचितच पाहावयास मिळतात. आणि इतरांच्या संरक्षणार्थ जे जगतात, ते निःसंशय माणुसकीच्या कोषात प्रथम स्थानी असतात. पण जेव्हा जीवावर बेततं, तेव्हा प्रत्येकजण स्वरक्षणासाठी धडपड करत असतो, जे कि स्वाभाविक आहे. परिणामी माणूस हा, तेव्हा जास्त इश्वराधीन होतो. संकट समई, दुःखाच्या वेळीच ईश्वराचं स्मरण जास्तीचं होणं स्वाभाविक आहे. जिथे सर्व पर्याय संपतात तेव्हा एकच पर्याय सर्वांसाठी खुला असतो.
_____अंगावर दगड पडत असतांना संरक्षणाला मध्ये आच्छादन कसे घेऊ नये ? रोगाविषयी पीडित असतांना औषधाविषयी उदासीन असणे कसे योग्य होईल ?  चोहोबाजूंनी वणवा पेटला, तर..! तेथून निघून जाऊ नये काय ? त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्युलोकात येऊन ईश्वरभक्ती करू नये किंवा भक्तीवाचून (श्रद्धा) सूख मिळेल काय ? 

______श्रद्धा न ठेवता जीवाच्या ठिकाणी असे कोणते सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्याच्या बळावर संसाराविषयी किंवा भोगाविषयी त्याला काळजी करण्याचे कारणच राहणार नाही. जेवढे भोग्य विषय आहेत ते तर एका देहाच्या सुखाकरिता आहेत आणि देहाचा विचार केला तर तो काळाच्या तोंडात पडला आहे. काळावर विजय मिळवायचा असेल तर श्रद्धा हे एकमेव साधन आहे, पण ज्ञानगंगेत श्रद्धेच्या नावेतून प्रवास करताना अंधश्रद्धेचे गढूळ पाणी मागे सारून जमल्यास नितळ करून पुढे चालत राहणे महत्वाचे.

____नित