पांडुरंगा

करी भेदाभेद

देवाचिये द्वारी

मन माझे वैरी

पांडुरंगा ।
छंद मायबापा

लागो पांडुरंगा

असे मी अभागा

तुजवीन ।
नको काही दुजे

मना लागो आस

तुझी धरो कास

क्षणोक्षणी ।
पौर्णिमेचा चंद्र

होत जाई उणे

तैसे माझे जिणे

तुजवीन ।
राहूदे अखंड

प्रीती तुजवरी

असे सर्वोपरी

तूच देवा ।
सुफल संसार

होऊ दे गे माये

तुझीच गे ठाये

विश्व सारे ।
नित्य नित्य मनी

हरी आठवावा

हेचि देगा देवा

दान मज ।
एकदा घडावी

पंढरीची वारी

प्रेमभाव उरी

असोनिया ।
भक्ती महाद्वारी

रिंगण अद्वैती

राहून सांगाती

तूच खेळे ।
सारे संतजन

तुज आळविती

तीच अनुभूती

यावी मज ।
सकल जनांचा

तूच एक दाता

तूच रे विधाता

पांडुरंगा ।

___नित(९६३७१३८०३१)

नितेश पाटील (धनसार, पालघर)