समई
वाती विन समई
तेलाचं मोल व्यर्थ
मानवते विन वस्ती
देहाचं मोल व्यर्थ
चौर्यांशीच्या फेऱ्यात
एकदा जन्मतो तु
मृत्यूहून लांब तरी
का रोज मारतोस तु….
काळ येई दैव कृपे
समई जळून उजेड देई
धुंडतो तयाची उत्तरे
दाह तिचा तीच घेई
अधुरी वाती विन समई
प्रकाश न देई अर्थहीन
अंत तुझा तु नश्वर निष्ठ
शेष तो, जीवांचे उजळे जीवन
…….नीतेश पाटील
९६३७१३८०३१
