अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत कमी अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.आपला आत्मा वाढतही नाही आणि मरतही नाही,तर मारतो किंव्हा वाढतो तो आपला देह.
सोळा कलेचा चंद्र सुशोभे
काळरात्र एक सूक्ष्म कला
कलेतसे अधु-अधिकपणा
विकार न परी बाधक चंद्रा
फिरुन चौऱ्यांशीच्या फेरा
एकदा मिळे मानव देह हा
देह विकारी आत्मा
जगी प्रपंची देह शुशोभे
